जागतिक घडामोडींमध्ये सध्या अनिश्चित काळ असून धोरणात्मक अनिश्चितता आणि आर्थिक अस्थिरता दोन्ही वाढत असल्याचं परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी म्हटलं आहे.
जर्मन एकता दिनाच्या समारंभात बोलताना डॉक्टर जयशंकर यांनी सांगितलं की, जागतिक व्यवस्था स्थिर करण्यासाठी तसंच शांतता, प्रगती आणि समृद्धीला चालना देण्याकरिता भारत आणि जर्मनीची महत्त्वाची जबाबदारी आहे.
परस्पर सहकार्य वाढवून आणि परस्पर लाभदायक कार्यक्रम पत्रिकेद्वारे हे सर्वोत्तम प्रकारे साध्य करता येईल. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर जर्मनीच्या स्पष्ट भूमिकेबद्दल डॉक्टर जयशंकर यांनी आभार मानले.
 
									 
		 
									 
									 
									 
									