परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर आजपासून दोन दिवसांच्या चीन दौऱ्यावर रवाना होत आहेत. शांघाय सहकार्य संघटनेतील 10 सदस्य देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या आज होणाऱ्या बैठकीला ते उपस्थित राहातील.
या बैठकीत विविध क्षेत्रातल्या महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. त्याशिवाय जयशंकर या देशांच्या नेत्यांशी द्वीपक्षीय बैठका घेतील. तसेच चीनचे समपदस्थ वांग यी यांचीही भेट घेण्याची शक्यता आहे.