डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

July 1, 2025 9:21 AM | S Jayshankar

printer

परराष्ट्र व्यवहार मंत्री आज अमेरिकेत क्वाड परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होणार

परराष्ट्र व्यवहार  मंत्री डॉ.एस.जयशंकर आज अमेरिकेत होणाऱ्या क्वाड परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होणार आहेत. या बैठकीत प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवर विशेषतः हिंद-प्रशांत क्षेत्राशी संबंधित बाबींवर ते चर्चा  करतील.

 

या बैठकीचं  यजमानपद अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो हे भूषवणार  असून यावेळी ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र मंत्री पेनी वोंग आणि जपानचे परराष्ट्र मंत्री इवाया ताकेशी देखील उपस्थित राहणार  आहेत.