आपली सर्व उद्दिष्ट्ये साध्य होईपर्यंत युक्रेनविरोधातली लष्करी कारवाई सुरूच ठेवणार असल्याचं रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी म्हटलं आहे. पुतिन आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी काल झालेल्या दूरध्वनीवर चर्चा झाली. या चर्चेत त्यांनी ही बाब स्पष्ट केल्याची माहिती रशियाचे परराष्ट्र धोरण सल्लागार युरी उषाकोव्ह यांनी दिली. हा संघर्ष लवकरात लवकर संपवावा हे ट्रम्प यांचं आवाहन पुतीन यांनी फेटाळलं असल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र युक्रेनसोबत राजकीय संवादाच्या माध्यमातून या संघर्षावर तोडगा काढायची रशियाची तयारी असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.