रशियानं युक्रेनच्या सहा भागांमधल्या ऊर्जा आणि गॅस क्षेत्रातल्या पायाभूत सुविधांना लक्ष्य करून मोठा ड्रोन हल्ला केला. या हल्ल्यात पोल्टावा भागातल्या गॅस वाहतूक आस्थापनेचं मोठं नुकसान झाल्याचं, तर सुमी भागात एका महत्त्वाच्या उपकेंद्रातल्या यंत्रसामग्रीलाही फटका बसल्याचं वृत्त आहे.
या हल्ल्यांमुळे पोल्टावा, सुमी आणि चर्नीहिव भागात वीजपुरवठा खंडित झाल्याची माहिती युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी दिली आहे.