रशियानं युक्रेनवर केलेल्या हल्ल्यांनंतर कीवमधील मृतांची संख्या 23वर पोहोचली असून किमान 48 जण जखमी झाले आहेत. या हल्ल्यांमुळे कीवमधील युरोपियन युनियन मिशन आणि ब्रिटिश कौन्सिल मुख्यालयासह सात जिल्ह्यांमधील अनेक इमारतींचं नुकसान झालं आहे. बचाव पथकं, मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचा शोध घेत असून मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.
दोन्ही देशांमध्ये युद्ध सुरू झाल्यापासून रशियानं केलेला हा सर्वात मोठा हल्ला होता; असं कीवच्या हवाई दलाने म्हटलं आहे. युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. दरम्यान दोन्ही देशांमध्ये शांततेसाठी चर्चा व्हावी अशी रशियाची भूमिका आहे; मात्र त्याचवेळी लष्करी कारवाईही सुरूच आहे असं क्रेमलीननं म्हटलं आहे.