रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन भारत दौऱ्यावर

२३व्या भारत-रशिया वार्षिक शिखर परिषदेसाठी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आज भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दोन दिवसांच्या दौऱ्यादरम्यान, पुतिन उद्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशीचर्चा करतील. दोन्ही नेते परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर विचार विनिमय करतील. व्यापार, अर्थव्यवस्था, आरोग्यसेवा, शैक्षणिक, संस्कृती आणि माध्यमांशी संबंधित अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होण्याची अपेक्षा आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूही पुतीन यांची भेट घेणार असून त्यांच्या सन्मानार्थ मेजवानीचे आयोजन करण्यात आलं आहे.