डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

रशियानं केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात युक्रेनमधल्या ३२ नागरिकांचा मृत्यू, ८४ जण गंभीर

युक्रेनच्या ईशान्य भागातील सुमी शहरात आज रशियानं केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात दोन मुलांसह ३२ लोक ठार झाले तर, ८४ जण गंभीर जखमी झाले आहेत अशी माहिती युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. जखमींमध्ये दहा लहान मुलांचाही समावेश असल्याचं या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.  पाम संडेच्या निमित्तानं नागरिक मोठ्या संख्येनं चर्चमधल्या प्रार्थना सभेसासाठी जमले होते, तसंच रस्त्यांवरही मोठी गर्दी होती त्यावेळी हा हल्ला झाला. २०२३ नंतर रशियानं युक्रेनच्या नागरिकांवर केलेला हा सर्वात प्राणघातक हल्ला ठरला आहे. 

 

हा हल्ला दहशतवादी कृत्य असल्याचं युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी म्हटलं आहे. या हल्ल्याविरोधात जगभातल्या इतर देशांनी कठोर प्रतिक्रिया द्यावी असं आवाहनही त्यांनी केलं आहे.