अमेरिका आणि नाटोच्या क्षेपणास्त्र संबंधी धमक्यांना जशास तसं उत्तर दिलं जाईल – परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव्ह

अमेरिका आणि नाटोच्या क्षेपणास्त्र संबंधी धमक्यांना जशास तसं उत्तर दिलं जाईल असा इशारा रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी दिला आहे. रशिया कोणत्याही परिस्थितीसाठी तयार आहे. आम्ही समन्यायी चर्चेसाठी योग्य परिस्थिती निर्माण व्हावी याकरताही पावलं उचलू, मात्र आपल्या शत्रूंनी धमकी दिली तर त्यांना लष्करी अथवा तंत्रज्ञानाविषयक प्रतिकाराच्या स्वरूपात निर्णायक प्रत्युत्तर देऊ असं त्यांनी शासकीय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.