डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांची जागतिक नेत्यांप्रती कृतज्ञता व्यक्त

युक्रेन संघर्षावर तोडगा काढण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक जागतिक नेत्यांनी सातत्यानं लक्ष घातल्याबद्दल रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. बेलारूसचे अध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेंको यांच्यासमवेत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते काल बोलत होते.  जागतिक स्तरावर अनेक आव्हानं असूनदेखील युद्धग्रस्त भागात लवकरात लवकर शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तसंच ब्राझील आणि दक्षिण आफ्रिकेच्या अध्यक्षांनी दाखवलेल्या वचनबद्धतेबद्दल त्यांनी आभार मानले.  

 

रशिया आणि युक्रेन यांच्यातल्या संघर्षात भारताची भूमिका तटस्थ नव्हे तर शांततेच्या पक्षात असल्याचं नरेंद्र मोदी यांनी गेल्या महिन्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान सांगितलं होतं. हे युग युद्धाचं नाही आणि युद्धबंदीसाठी अमेरिका करत असलेल्या प्रयत्नांना भारताचा पाठिंबा आहे, असंही प्रधानमंत्र्यांनी स्पष्ट केलं होतं. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा