रशियानं मध्यरात्री युक्रेनवर ड्रोन्स आणि क्षेपणास्त्रांनी केलेल्या हल्ल्यात १० जण ठार झाले असून २८ जण जखमी झाले आहेत. या हल्ल्यांमुळे युक्रेनच्या तीन प्रातांमध्ये महत्त्वाच्या ऊर्जा प्रकल्पांना फटका बसला आहे. रशियानं साडेचारशेपेक्षा जास्त ड्रोन्स आणि ४५ क्षेपणास्त्रं डागल्याची माहिती युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदिमिर झेलेन्स्की यांनी दिली. तर, युक्रेननं डागलेले दोन हवाई बॉम्ब आणि १७८ हवाई यंत्रं पाडल्याचं रशियाच्या संरक्षण मंत्रालयानं सांगितलं.
Site Admin | November 8, 2025 8:09 PM | Russia-Ukraine War
रशियानं युक्रेनवर केलेल्या हल्ल्यात १० ठार, २८ जखमी