युक्रेनमधे रशियाने क्षेपणास्त्र हल्ल्यांमधे किमान ६ जणांचा मृत्यू झाला असून त्यात २ लहान मुलांचा समावेश आहे. या हल्ल्यांमधे अन्य २१ जण जखमी झाले आहेत. युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी सांगितलं की रशियाने युक्रेनच्या ऊर्जानिर्मिती केंद्रांवर केलेल्या हल्ल्यांमुळे कीवच्या अनेक भागात नागरी वस्तीत आग पसरली. याच्या प्रत्युत्तरात युक्रेनने रशियतल्या रसायन प्रकल्पावर ब्रिटीश स्टॉर्म शॅडो क्षेपणास्त्रांचा मारा केला. रशियाने अद्याप यावर काहीही भाष्य केलेलं नाही.
दरम्यान, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी शस्त्रसंधीला नकार दिल्यानंतर नियोजित ट्रंप – पुतीन चर्चा अमेरिकेने पुढं ढकलली आहे.