रशियानं युक्रेनवर केलेल्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यात पाच जणांचा मृत्यू झाला असून अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाल्यानं हजारो घरांमध्ये काळोख पसरला आहे. रशियाच्या संरक्षण मंत्रालयानं या वृत्ताला दुजोरा दिला असून आपण युक्रेनच्या लष्करावर आणि पायाभूत सुविधांवर यशस्वीरीत्या हल्ला केल्याचं म्हटलं आहे.
रशियाच्या भूप्रदेशात हल्ले करण्यासाठी युक्रेनला मदत करेल या अमेरिकेच्या भूमिकेनंतर हा हल्ला झाला आहे. तर रशियाच्या हवाई संरक्षण दलानं युक्रेनच्या ३२ ड्रोनना उध्वस्त केल्याचं रशियाच्या प्रसार माध्यमांनी सांगितलं. युक्रेन रशियाच्या तेल शुद्धीकरण प्रकल्पाच्या परिसरात ड्रोन डागण्याचा विचार करत असून त्यामुळे विविध भागात इंधन टंचाईची शक्यता निर्माण होऊ शकते.