डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

तुर्कीयेमधे इस्तंबूल इथं रशिया आणि युक्रेनच्या शिष्टमंडळांची बैठक सुरु

तुर्कीयेमधल्या इस्तंबूल इथे रशिया आणि युक्रेनच्या शिष्टमंडळांची आज बैठक सुरु असून ही दोन्ही देशांमधली गेल्या तीन वर्षांमधली पहिली बैठक आहे. युक्रेनच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व संरक्षण मंत्री रुस्टम उमरोव्ह करत असून रशियाच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व अध्यक्षांचे सहायक व्लादिमिर मेडिन्स्की करत आहेत. भविष्यात होणाऱ्या, दोन्ही देशांच्या अध्यक्षांच्या बैठकीसाठी पूर्वपीठिका तयार करण्याचं काम या बैठकीत होत आहे, असं तुर्कीयेचे परराष्ट्र मंत्री हाकान फिदान यांनी म्हटलं आहे. ते या बैठकीचे अध्यक्ष आहेत.

 

या बैठकीच्या आधी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो नाटो देशांच्या बैठकीत सहभागी होऊन इस्तंबूल इथं पोचले आहेत. अमेरिका आणि रशियाच्या प्रतिनिधींमध्येही एक छोटी बैठक नुकतीच पार पडली आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा