यूक्रेनचे १२१ ड्रोन आपण नष्ट केल्याचं रशियाच्या संरक्षण मंत्रालयानं एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केलं आहे. युक्रेननं रोस्तोव्ह, वोल्गोग्राड, ब्रायन्स्क, कलुगा, स्मोलेन्स्क, बेल्गोरोड, मॉस्को, वोरोनेझ, लेनिनग्राड, नोव्हगोरोड, रियाझान, तांबोव, टव्हर आणि तुला या भागांमध्ये हल्ला करण्यासाठी ड्रोन पाठवले होते. मात्र रशियाच्या संरक्षण दलानं काल रात्री ते यशस्वीपणे परतवून लावल्याचं यात म्हटलं आहे.
दरम्यान, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यातली पूर्वनियोजित शिखर परिषद पुढे ढकलण्यात आल्याचं रशियाचे राजदूत किरील दिमित्रीव्ह यांनी सांगितलं.