डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

September 15, 2025 9:05 PM | Russia-Ukraine

printer

युक्रेनला निधी पुरवठा करण्याचा प्रयत्न करणाऱ्या देशाला रशियाचा इशारा

रशियाच्या मालकीच्या मालमत्तेवर आणि ठेवींवर टाच आणून युक्रेनला निधी पुरवठा करण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रत्येक  युरोपियन देशाला सडेतोड उत्तर देण्याचा इशारा आज रशियानं दिला आहे. युरोपियन आयोग रशियाची मालमत्ता ताब्यात घेऊन युक्रेनला निधी पुरवठा करण्याच्या प्रयत्नात असून या पार्श्वभूमीवर रशियानं कारवाईचा इशारा दिला असल्याचं  सूत्रांनी म्हटलं आहे.   रशियाची ३०० बिलियन डॉलर इतक्या किमतीची मालमत्ता आणि ठेवी अमेरिकेच्या, इंग्लंडच्या तसाच युरोपिअन राष्ट्रांच्या ताब्यात आहेत. २०२२ मध्ये रशियानं युक्रेनवर हल्ला केल्यानंतर या देशांनी संबंधित मालमत्ता ताब्यात घेतली आहे. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.