युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की आज युरोपमधल्या काही नेत्यांसह अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहेत. रशियाच्या ताब्यात असलेल्या काही भागांवरचा दावा सोडावा, यासाठी ट्रम्प यांनी झेलेन्स्की यांच्यावर दबाव वाढवला आहे.
झेलेन्स्की यांची इच्छा असेल, तर ते रशियाविरुद्धचं युद्ध कोणत्याही क्षणी थांबवू शकतात, किंवा सुरू ठेवू शकतात, याचा पुनरुच्चार काल ट्रम्प यांनी केला. सध्या युक्रेनच्या जवळपास २० टक्के भूभागावर रशियाचा ताबा आहे.