रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेला संघर्ष शांततेच्या मार्गानं त्यावर लवकरात लवकर संपवण्याची काढण्याची रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची इच्छा असल्याचं क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी एका मुलाखतीत सांगितलं.
युक्रेनबरोबरच्या शांतता करारात चार ठिकाणांहून युक्रेन सैन्यानं माघार घ्यावी, युक्रेननं नाटोमध्ये सहभागी होण्याची इच्छा मागं घ्यावी आणि नाटो सैनिकांना तैनात न करणं या मुद्द्यांचा समावेश असावा, हे याआधीही रशियन अधिकाऱ्यांनी स्पष्ट केल्याचं पेस्कोव्ह यांनी सांगितलं. दरम्यान, या आठवड्यात रशियाबरोबर शांतता प्रस्ताव चर्चेवर बैठकीचा प्रस्ताव युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी मांडला आहे.
रशिया आणि युक्रेन यांच्यात येत्या ५० दिवसांत युद्धविराम करार झाला नाही तर, रशियावर कठोर शुल्क लादलं जाईल तसंच नाटोमार्फत युक्रेनला शस्त्रांचा पुरवठा केला जाईल, असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्याच आठवड्यात दिला. मात्र, रशियानं ५० दिवसांची मुदत फेटाळून लावली आहे.