डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

रशिया आणि युक्रेनचं शिष्टमंडळ शांततेसाठी संवाद साधणार

रशिया आणि युक्रेनचं शिष्टमंडळ आज तुर्कीए मध्ये इस्तंबूल इथं शांततेसाठी थेट संवाद साधणार आहेत. तीन वर्षांपूर्वी दोन्ही देशांमध्ये समोरासमोर चर्चा झाली होती. 

 

दरम्यान, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन शांततेच्या चर्चेत सहभागी होणार नसून, त्याऐवजी, त्यांचे सहाय्यक व्लादिमीर मेडिन्स्की रशियन शिष्टमंडळाचं नेतृत्व करतील, असं रशियानं स्पष्ट केलं आहे. 

 

यापूर्वी, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी पुतिन यांना प्रत्यक्ष भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. तसंच ही चर्चा यशस्वी ठरावी, यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू असं त्यांनी म्हटलं होतं. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा