युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी काल रात्री फ्लोरिडा इथं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. रशिया आणि युक्रेन हे दोन्ही देश युद्ध संपवण्याच्या पक्षात असून शांतता प्रस्थापित करण्यासाठीच्या वाटाघाटीत बरीच प्रगती झाली आहे, या वाटाघाटी काही आठवड्यात पूर्ण होण्याची अपेक्षा आहे, असं ट्रम्प यांनी या भेटीनंतर पत्रकारांना संबोधित करताना सांगितलं. या भेटीपूर्वी ट्रम्प यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी जवळपास अडीच तास फोनवरून चर्चा केली.
Site Admin | December 29, 2025 1:06 PM | Russia-Ukraine
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की आणि डोनाल्ड ट्रम्प यांची भेट