युक्रेननं काल रात्री रशियाच्या नोव्होरोसियस्क या बंदरातल्या महत्वाच्या तेल टर्मिनलवर हल्ला केला. त्यामुळे लागलेल्या आगीत पायाभूत सुविधांचं मोठं नुकसान झालं. रशियाच्या सर्वात मोठ्या तेल निर्यात सुविधांपैकी एक असलेल्या या टर्मिनलवर युक्रेनियन सैन्यानं हल्ला केल्याच्या वृत्ताला दोन्ही देशांनी दुजोरा दिला आहे. युक्रेनच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देत, रशियानं काल रात्री युक्रेनचे २१६ ड्रोन नष्ट केल्याचं रशियन गव्हर्नर वेनियामिन कोंड्राटिव्ह यांनी सांगितलं.
Site Admin | November 15, 2025 7:41 PM | rassia ukren | Russia-Ukraine
युक्रेनचा रशियाच्या नोव्होरोसियस्क बंदरातल्या महत्वाच्या तेल टर्मिनलवर हल्ला