रशियातल्या कामचात्का क्षेत्रातल्या पूर्व किनारपट्टीवर आज सकाळी सात पूर्णांक ४ दशांश रिक्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. यानंतर या क्षेत्रात त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे.
कामचात्का क्षेत्राचं प्रशासकीय मुख्यालय असलेल्या पेट्रोपाव्हलोव्हस्क – कामचत्स्कीच्या पूर्वेला १११ किलोमीटर अंतरावर या भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचं अमेरिकेच्या भूगर्भीय सर्वेक्षण विभागानं म्हटलं आहे. दरम्यान, या भूकंपामुळे जपानच्या किनाऱ्यावरपट्टीवरही समुद्राच्या लाटांमध्ये किरकोळ चढ उतार होऊ शकतात असा इशारा तिथल्या हवामान विभागानं दिला आहे.