August 6, 2025 4:01 PM

printer

भारतानं रशियाकडून खनिज तेल आयात बंद केल्याचा अमेरिकेचा दावा रशियानं फेटाळला

भारताने रशियाकडून खनिज तेल आयात बंद केल्याचा  अमेरिकेचा दावा  रशियानं फेटाळला असून कोणत्याही सार्वभौम देशाला त्याच्या राष्ट्रीय हितासाठी व्यापार भागीदाराची स्वतंत्रपणे निवड करण्याचा अधिकार असल्याचंही रशियानं म्हटलं आहे. रशियन प्रशासनाचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी काल मॉस्कोमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत अमेरिका भारतावर दबाव आणत असल्याचा आरोप केला. भारत रशियाकडून खनिज तेल विकत घेऊन त्याची पुनर्विक्री करत असल्याबद्दल भारतावर वाढीव आयात शुल्क लादण्याचा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच दिला होता, त्या पार्श्वभूमीवर रशियानं ही प्रतिक्रिया दिली आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.