डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

November 2, 2025 8:24 PM

printer

रशियाची नवी आण्विक पाणबुडी ‘खाबारोव्स्क’ त्यांच्या नौदलात दाखल

रशियानं त्यांची नवी आण्विक पाणबुडी ‘खाबारोव्स्क’ त्यांच्या नौदलात दाखल केली आहे. ‘पोसायडॉन’ किंवा ‘डूम्सडे क्षेपणास्त्र’ म्हणून ओळखला जाणारा ड्रोन वाहून नेण्यासाठी ही पाणबुडी तयार केली आहे. आंतरखंडीय प्रवास करण्यासाठी ही पाणबुडी सक्षम असून, ती प्रचंड विनाश करू शकते. रशियाचे संरक्षण मंत्री आंद्रेई बेलोसोव्ह यांनी सेव्हेरोडविन्स्क इथल्या सेवमाश शिपयार्ड इथं रशियन नौदल प्रमुख डमिरल अलेक्झांडर मोइसेयेव आणि इतर वरिष्ठ जहाजबांधणी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत खाबारोव्स्कचा नौदलात औपचारिक समावेश केला.