रशियाचा यूक्रेनची राजधानी कीववर ड्रोन हल्ला

रशियाने आज पहाटे यूक्रेनची राजधानी कीव इथे ड्रोन हल्ला केला. रशियाने डागलेल्या ७३ पैकी ६७ ड्रोन आणि तीन क्षेपणास्त्रांपैकी एक पाडलं. या दरम्यान, कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नसल्याची माहिती यूक्रेन सैन्याने दिली आहे.