रशिया हा भारताचा कच्च्या तेलाचा सर्वात मोठा पुरवठादार

रशिया हा भारताचा कच्च्या तेलाचा सर्वात मोठा पुरवठादार झाला आहे. देशाच्या कच्च्या तेलाच्या आयातीमधला ३५ टक्क्यांहून अधिक वाटा रशियाचा असल्याची माहिती केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी काल दिली. नवी दिल्लीत काल फिपी तेल आणि वायू पुरस्कार सोहळ्यात पुरी बोलत होते. गेल्या दोन वर्षात देशाच्या तेलाच्या स्रोतांमध्ये झालेल्या बदलावर प्रकाश टाकत, फेब्रुवारी २०२२ पासून रशियाकडून होणाऱ्या आयातीत सातत्यपूर्ण वाढ झाली असल्याचंही त्यांनी नमूद केलं.