डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

September 29, 2024 2:49 PM | Russia

printer

हिजबोलाचा प्रमुख सय्यद हसन नसरल्लाच्या हत्येचा रशियाकडून निषेध

हिजबोलाचा प्रमुख सय्यद हसन नसरल्लाच्या हत्येचा रशियाने तीव्र शब्दात निषेध केला आहे. इस्राएलने काल लेबनॉनची राजधानी बैरुट इथं केलेल्या हवाई हल्ल्यात नसरल्ला मारला गेला. इस्राएलने ही आणखी एक राजकीय हत्या केली असून लेबनॉनवरचे हल्ले ताबडतोब थांबवावे अशी मागणी रशियाने केली आहे. दरम्यान नसरल्ला मारला गेला त्याचं समर्थन करणारं निवेदन इस्राएलने जारी केलं आहे. हिजबोलाने पॅलेस्टाईनच्या पाठिंब्यात आपलं युद्ध चालू राहील असं स्पष्ट केलं आहे. गेल्या आठवडाभरात इसराएलने लेबनॉनवरचे हल्ले वाढवले आहेत. त्यामुळे प्रभावित होऊन सुमारे दोन लाख लेबनीज देशोधडी लागले आहेत. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.