रशियाचे दोन ब्रिटीश राजदुतांवर हेरगिरीचा आरोप करत देश सोडण्याचे आदेश

रशियाने आज दोन ब्रिटीश राजदुतांवर हेरगिरीचा आरोप करत दोन आठवड्यांच्या आत देश सोडण्याचे आदेश दिले. रशियाच्या फेडरल सिक्युरिटी सर्विसने राजदूतांवर वैयक्तिक माहिती पुरवल्याचा आणि राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या कारवायांमध्ये सहभागी असल्याचा आरोप केला आहे. मात्र, या संदर्भातला कोणतीही पुरावा सादर केलेला नाही