नंदुरबार जिल्हा पोलीस यंत्रणेमार्फत भरोसा सेल तसंच दामिनी पथकांचं  काम उत्तमरित्या सुरू-रूपाली चाकणकर

नंदुरबार जिल्हा पोलीस यंत्रणेमार्फत भरोसा सेल तसंच दामिनी पथकांचं  काम उत्तमरित्या सुरू असल्याचं प्रतिपादन महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी आज नंदुरबार इथं आढावा बैठकीत केलं. या पथकांनी बालविवाह, गर्भलिंगनिदान, हुंडाबळी तसंच  कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकरणाबाबत  कडक कारवाई करावी. कामाच्या ठिकाणी होणाऱ्या महिलांच्या लैंगिक छळाविरूद्ध कारवाई करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समित्यांच्या कार्याचा अहवाल प्रशासनानं  १५  दिवसांत आयोगाला सादर करावा, असे निर्देशही चाकणकर यांनी यावेळी दिले.   नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात उभारण्यात आलेल्या  महिला समुपदेशन आणि  सुसंवाद केंद्राचं  उद्घाटनही चाकणकर यांनी केलं.