डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

पालघरमध्ये पोलिस ठाण्यांच्या हद्दीत ‘रन फॉर युनिटी’ मॅरेथॉनचं आयोजन

नागरिकांमध्ये राष्ट्रीय एकात्मतेची भावना दृढ करण्यासाठी पालघर जिल्ह्यातल्या सर्व पोलिस ठाण्यांच्या हद्दीत ‘रन फॉर युनिटी’ मॅरेथॉन आयोजित करण्यात आली होती. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त आयोजित या उपक्रमात पोलीस दलातले अधिकारी,  अंमलदार तसंच सुमारे ८,००० नागरिकांनी सहभाग घेतला. यावेळी उपस्थितांना एकतेची शपथही देण्यात आली. 

 

अकोला जिल्ह्यातल्या मूर्तिजापूर इथंही रन फॉर युनिटी मॅरेथॉन आयोजित करण्यात आली होती. या मॅरेथॉनमध्ये पोलीस, शासकीय कर्मचारी, विद्यार्थी तसंच नागरिक सामाजिक संदेश देणारे फलक घेऊन सहभागी झाले होते.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.