भारतीय रेल्वेनं रुद्रास्त्र या साडेचार किलोमीटर लांबीच्या मालगाडीची यशस्वी चाचणी घेतली. उत्तर प्रदेशातल्या चंदौलीत गंजख्वाजा स्थानकापासून झारखंडमधल्या गरवा स्थानकादरम्यानच्या २०९ किलोमीटरच्या टप्प्यात या गाडीची चाचणी घेतली. या गाडीनं ताशी साडेचाळीस किलोमीटर या वेगानं ५ तास १० मिनिटात हे अंतर पार केलं. ही आशियातली सर्वात लांब मालगाडी असून मालवाहतूक आणि मालाची चढउतार जलद होईल, त्यामुळे साधनसंपत्तीची आणि वेळेचीही बचत होईल असं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. त्यांनी या गाडीच्या चाचणीवेळचा व्हिडिओही समाज माध्यमावर शेअर केला आहे.
Site Admin | August 9, 2025 3:03 PM | Railway | Rudrastra
रुद्रास्त्र या साडेचार किलोमीटर लांबीच्या रेल्वे मालगाडीची यशस्वी चाचणी
