August 16, 2025 7:47 PM

printer

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला येत्या विजया दशमीला शंभर वर्षे पूर्ण

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला येत्या विजया दशमीला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती आरएसएसचे राष्ट्रीय सहप्रचार प्रमुख प्रदीप जोशी यांनी दिली. ते गुवाहाटी इथं वार्ताहरांशी बोलत होते. जन्मशताब्दीनिमित्त चार संघटनात्मक कार्यक्रम देशभरात आयोजित केले जाणार आहेत. यात गणवेष कार्यक्रम, घरोघरी संपर्क अभियान, आजी-माजी स्वयंसेवकांना पत्र पाठवणं आणि  सात दिवसांची शाखा यांचा समावेश आहे. संघटनात्मक कार्यक्रमांशिवाय हिंदू संमेलन, ब्लॉकस्तरावरची संमेलनं आदी अनेक सार्वजनिक कार्यक्रमदेखील आयोजित केले जाणार आहेत, असं जोशी यांनी सांगितलं.