डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

बांगलादेशात होत असलेल्या हल्ल्याच्या वृत्तांची केंद्रसरकारकडून गंभीर दखल

बांगलादेशात हिंदू आणि इतर अल्पसंख्याकांवर हल्ले होत असल्याच्या वृत्तांची गंभीर दखल घेतली असल्याचं केंद्रसरकारने आज राज्यसभेत सांगितलं. परराष्ट्र व्यवहार राज्य मंत्री कीर्तीवर्धन सिंग यांनी एका लेखी उत्तरात सांगितलं की बांगला देशात हिंदू मंदिरं, आणि हिंदूंची घरं, दुकानं इत्यादींवर हिंसक हल्ले होत असल्याची गंभीर दखल घेऊन सरकारने त्याबाबात बांग्ला देशच्या सरकारकडे चिंता व्यक्त केली आहे. यासंदर्भात ८८ गुन्हे दाखल झाले असून सुमारे ७० जणांना बांगलादेश पोलिसांनी अटक केली आहे. तिथल्या नागरिकांच्या सुरक्षा आणि  स्वातंत्र्याची जबाबादारी बांगला देश सरकारची असून ते योग्य पावलं उचलेल, अशी भारताची अपेक्षा असल्याचं ते म्हणाले. परराष्ट्रव्यवहार खात्याच्या सचिवांनीही या चिंतेचा पुनरुच्चार बांगला देश भेटीत केला असल्याचं त्यांनी सांगितलं.  

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.