July 29, 2024 7:16 PM | Ashadhi Wari

printer

आषाढी वारीत सहभागी १५०० दिंड्यांना सानुग्रह अनुदानापोटी ३ कोटी रुपये प्रदान

नुकत्याच पार पडलेल्या आषाढी वारीत सहभागी झालेल्या राज्यभरातल्या १५०० दिंड्यांना सानुग्रह अनुदानापोटी ३ कोटी रुपये प्रदान करण्यात आले असल्याची माहिती शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेनेचे अध्यक्ष ह.भ.प. अक्षय महाराज भोसले यांनी आज वार्ताहर परिषदेत दिली. या दिंड्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी २० हजार रुपये वर्ग करण्यात आल्यामुळं वारकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण असल्याचं भोसले महाराज यावेळी म्हणाले. आजच्या परत वारीच्या पार्श्वभूमीवर संबंधित दिंडी प्रमुखांच्या वतीनं भोसले यांनी शासनाचे आभार मानले. वारकऱ्यांना सोयी-सुविधा पुरवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या अभूतपूर्व निर्णयांमुळं यंदाचा आषाढी वारीचा सोहळा सर्वार्थानं आनंददायी ठरला, असंही भोसले म्हणाले.