रोमानियामध्ये आज राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री साडेअकरा वाजता मतदानाला सुरुवात होईल. गेल्या वर्षी झालेल्या निवडणुकीत फसवणूक आणि घोटाळा झाल्याचा निर्णय देत रोमानियाच्या सर्वोच्च न्यायालयानं निवडणुक अवैध ठरवली होती. आजच्या निवडणुकीत AUR पक्षाचे जॉर्ज सिमियन, बुखारेस्टचे महापौर निकुसर डॅन, क्रिन अँटोनेस्कू आणि अपक्ष एलेना लास्कोनी यांच्यासह सात इतर उमेदवार देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. जर कोणत्याही उमेदवाराला ५० टक्क्यांहून अधिक मतं मिळाली नाहीत, तर १८ मे रोजी पुन्हा मतदान होईल.
Site Admin | May 4, 2025 2:27 PM | Presidential Election | Romania
रोमानियामध्ये राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मतदान
