भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये राजस्व अधिकाऱ्यांची भूमिका महत्त्वाची आहे असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर अकादमीच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते काल नागपूरमध्ये बोलत होते. राजस्व संकलनाच्या प्रमाणात लोककल्याणकारी योजनांसाठी निधी उपलब्ध होतो. त्यामुळं भारतीय राजस्व सेवेतील अधिकाऱ्यांचं लोककल्याणकारी अर्थव्यवस्थेतील योगदान महत्त्वाचं आहे असं मत गडकरी यांनी व्यक्त केलं.
अकादमीचे महासंचालक एस के मॅथ्यूज, आयकर लवाद प्राधिकरणाचे अध्यक्ष न्यायमूर्ती चंद्रकांत भडंग यावेळी उपस्थित होते.