डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

महाराष्ट्रात ३ वर्षांत १ लाखापेक्षा जास्त रस्ते अपघातांची नोंद

महाराष्ट्रात गेल्या तीन वर्षांत एक लाखापेक्षा जास्त रस्ते अपघातांची नोंद झाली असून त्यात जवळपास ४६ हजार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विधानसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना दिली. २०२२ ते २०२४ या कालावधीत अपघातांच्या संख्येत सातत्यानं वाढ झाल्याचं सरनाईक यांनी दिलेल्या आकडेवारीतून दिसून येत आहे.

 

वाहनचालकाने मद्यपान केलं आहे का, याची चाचणी करणाऱ्या यंत्रांसोबतच त्यांनी अन्य अंमली पदार्थांचं सेवन केलं आहे का, हेदेखील तपासणारी यंत्रं मागवण्याची प्रक्रिया राज्य सरकार राबवत असल्याचं सरनाईक यांनी सांगितलं. राज्यानं अद्याप महामार्गांवर इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिम लागू केलेली नसल्याचंही त्यांनी नमूद केलं.