माजी नगरसेवक नाना बागुल तसंच नंदलाल वाधवा यांचा रिपाई पक्षात प्रवेश

आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ कार्यकर्ते माजी नगरसेवक नाना बागुल तसंच सिंधी समाजाचे ज्येष्ठ नेते नंदलाल वाधवा यांनी आज रिपाई अर्थात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गटात  प्रवेश केला. त्याबाबतची घोषणा रिपाईचे  राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज मुंबई इथं केली. ते मुंबई मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.  माजी नगरसेवक नाना बागुल तसंच  नंदलाल वाधवा यांना   पुष्पगुच्छ देत आठवले यांनी  त्यांचं रिपाईत स्वागत केलं. 

नाना बागुल यांना प्रदीर्घ राजकीय, सामाजीक तसंच  प्रशासकीय अनुभव आहे. ते उल्हासनगर आणि ठाणे जिल्हातल्या राजकारणातले  एक मातब्बर नेते आहेत. तर नंदलाल वाधवा  उल्हासनगर मधील यशस्वी उद्योजक आणि ज्येष्ठ समाजसेवक म्हणुन कार्यरत आहेत. नाना बागुल आणि नंदलाल वाधवा  यांच्या प्रवेशामुळं  रिपब्लिकन पक्षाला बळकटी मिळेल असा विश्वास आठवले यांनी यावेळी व्यक्त केला.