आर जी कार रुग्णालयातल्या बलात्कार आणि खूनप्रकरणी दोषीला जन्मठेप

पश्चिम बंगालमधल्या आर जी कार रुग्णालयातल्या डॉक्टरवरच्या बलात्कार आणि खूनप्रकरणी दोषीला न्यायालयानं जन्मठेपेशी शिक्षा सुनावली आहे. सियालदाहमधल्या सीबीआयच्या विशेष न्यायालयानं हा निकाल दिला. पीडीतेच्या कुटुंबाला १७ लाख रुपये देण्याचे आदेशही न्यायालयानं दिले आहेत. आरोपी संजय राय याला शनिवारी दोषी ठरवलं होतं. गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात ही घटना घडली होती.