पश्चिम बंगालमध्ये महिला डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्याप्रकरणी न्याय मिळावा या मागणीसाठी काल कोलकाता इथे महालय उत्सवाच्या निमित्ताने हजारो कनिष्ठ डॉक्टरांनी निषेध मोर्चा काढला. या मोर्चात डॉक्टरांसह, परिचारिका, वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थीही देखील सहभागी झाले होते. मोर्चा संपल्यानंतर सर्व आंदोलनकर्त्यांनी गंगेच्या काठावर न्यायालयीन लढ्याचं प्रतीक म्हणून १ हजार दिवे प्रज्वलित केले. दरम्यान, आर. जी. कार रुग्णालयाच्या आवारात अभया नावाच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. या प्रकरणातल्या निषेधाचं प्रतीक म्हणून या पुतळ्याची निर्मिती केल्याची माहिती आंदोलनकर्त्या डॉक्टरांनी वार्ताहरांना दिली.
Site Admin | October 3, 2024 1:37 PM | RG Kar case
कोलकाता इथं महालय उत्सवाच्यानिमित्त कनिष्ठ डॉक्टरांचा निषेध मोर्चा
