भारतातील किरकोळ विक्री क्षेत्रानं यावर्षी नवरात्र ते दिवाळी दरम्यान सणासुदीच्या हंगामातील सर्वाधिक विक्री नोंदवली. यामध्ये अभूतपूर्व ५ लाख ४० हजार कोटी रुपयांच्या वस्तू आणि ६५ हजार कोटी रुपयांच्या सेवांची उलाढाल झाली. अखिल भारतीय व्यापारी महासंघानं केलेल्या देशव्यापी सर्वेक्षणात, याच कालावधीत एकंदर उलाढाल गेल्या वर्षीच्या तुलनेत २५ टक्क्यांनी वाढल्याचं दिसून आलं आहे. प्रामुख्यानं GST दरांमध्ये घट झाल्यामुळं ही वाढ झाली आहे. मिठाई, गृहसजावट, पादत्राणं, तयार कपडे, ग्राहकोपयोगी आणि दैनंदिन वापराच्या वस्तूंच्या किंमती सर्वसामान्य लोकांच्या आवाक्यात आल्या आहेत आणि खरेदीचा वेग वाढला आहे.
Site Admin | October 22, 2025 2:34 PM | retail sector
किरकोळ विक्री क्षेत्रात सणासुदीच्या हंगामातील सर्वाधिक विक्री
