ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित किरकोळ चलनफुगवट्याचा दर सप्टेंबर २०२५ मधे १ पूर्णांक ५४ शतांशांवर पोहोचला. केंद्रीय सांख्यिकी आणि कार्यक्रम विभागाने प्रसिद्ध केलेली आकडेवारी सांगते की, गेल्या ८ वर्षातला हा नीचांक आहे. ग्रामीण भागात महागाई एक पूर्णांक सात शतांश टक्क्यांनी कमी झाली तर शहरी भागात २ पूर्णांक ४ शतांश टक्क्यांनी कमी झाली. विशेषतः अन्नपदार्थांचे भाव या महिन्यात कमी झाले.
Site Admin | October 13, 2025 8:03 PM | Retail inflation
ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित किरकोळ चलनफुगवट्याचा दर १.५४ टक्के