डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

December 29, 2024 7:02 PM | Central Railway

printer

वर्षअखेरच्या गर्दीचं व्यवस्थापन करण्यासाठी मध्यरेल्वेच्या १४ स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटावर निर्बंध

वर्षअखेरच्या कालावधीत प्रचंड गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन मध्य रेल्वेने निवडक प्रमुख स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवर तात्पुरते निर्बंध घातले आहेत. प्लॅटफॉर्मवर होणाऱ्या गर्दीचे व्यवस्थापन आणि स्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचे नियोजन करणे हे या निर्बंधाचे उद्दिष्ट आहे. प्लॅटफॉर्म तिकिट विक्रीचे निर्बंध आजपासून २ जानेवारी च्या मध्यरात्री १२ वाजेपर्यंत लागू असतील.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण, पनवेल, पुणे, नागपूर, नाशिक रोड, भुसावळ, अकोला, सोलापूर, कलबुरगि आणि लातूर या स्थानकांवर हे निर्बंध लागू असून त्यातून ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती, आणि ज्यांना एकट्याने प्रवास करता येत नाही अशांना सूट दिली आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.