डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

प्रधानमंत्री ऋषी सुनक यांचा राजीनामा

ब्रिटनमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. या निवडणुकीत हुजूर पक्षाचा पराभव झाल्यानंतर प्रधानमंत्री ऋषी सुनक यांनी पदाचा राजीनामा दिला. निवडणुकीत झालेल्या पराजयाची जबाबदारी घेत सुनक यांनी हुजूर पक्षाच्या नेतेपदावरूनही पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे.

 

प्रधानमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर सुनक यांनी मनोगत व्यक्त केलं.हुजूर पक्षाला निवडणुकीत पराभव पत्करावा लागल्याबद्दल सुनक यांनी समर्थकांची माफी मागितली.तसंच २०१० च्या तुलनेत गेल्या १४ वर्षांत ब्रिटन समृद्ध, निःपक्ष आणि अधिक सक्षम झाल्याचं सुनक यांनी मनोगतात सांगितलं. दरम्यान, या निवडणुकीत मजूर पक्षानं घवघवीत यश मिळवलं असून पक्षाचे नेते कीयर स्टार्मर ब्रिटनचे नवे प्रधानमंत्री होणार आहेत.