डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

September 5, 2024 8:14 PM | RBI

printer

चालू आर्थिक वर्षासाठी ७ पूर्णांक २ दशांश टक्के सकल राष्ट्रीय उत्पादनाचा अंदाज – आरबीआय

भारताची आर्थिक वाढ योग्य मार्गावर सुरू असून चालू आर्थिक वर्षासाठी ७ पूर्णांक २ दशांश टक्के सकल राष्ट्रीय उत्पादनाचा अंदाज हा वास्तवाला धरून आहे, असं प्रतिपादन भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज केलं. फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री आणि इंडियन बँक्स असोसिएशन यांनी मुंबईत संयुक्तपणे आयोजित केलेल्या फिबॅक परिषदेत ते बोलत होते. भारतीय अर्थव्यवस्था ही स्थूल आर्थिक स्थैर्याने प्रगती करत असल्याचंही त्यांनी यावेळी नमूद केलं. सर्व समावेशक वाढीचं महत्त्वही दास यांनी अधोरेखित केलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.