आर्थिक क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाची गरज – आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास

आर्थिक क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता यांत्रिक आकलन आणि विदा विश्लेषणासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाची गरज रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी अधोरेखित केली आहे. वित्तीय धोरणाच्या लवचिकतेबद्दल चर्चा करण्यासाठी मुंबईत आयोजित परिषदेत ते आज बोलत होते. या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अचूक विश्लेषण शक्य असून जोखीम मोजमापासाठी बँका आणि बँकांखेरीजच्या वित्तीय संस्थांना त्याचा उपयोग होऊ शकतो असं ते म्हणाले. अर्थव्यवस्थेत दूरगामी स्थैर्य आणि लवचिकता राखण्याच्या दृष्टीनं नियमनाचं धोरण बदलत राहील असं त्यांनी सांगितलं.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.