डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

January 24, 2025 8:02 PM | Republic Day

printer

आयआयटी मुंबईचे उपसंचालक मिलिंद अत्रे यांना प्रजासत्ताक दिनाचं आमंत्रण

येत्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीत कर्तव्य पथावर पार पडणाऱ्या सोहळ्यासाठी आयआयटी मुंबईचे उपसंचालक मिलिंद अत्रे यांना आमंत्रित करण्यात आलं आहे. ते गेली २० वर्षं आयआयटी मुंबईत विविध विभागांमध्ये काम करत असून ते सध्या मेकॅनिकल विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला उपस्थितीत राहण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.