October 19, 2024 12:57 PM | monkeypox | yuganda

printer

युगांडा देशामध्ये मंकीपॉक्स च्या ४९ नव्या रुग्णांची नोंद

युगांडा देशामध्ये मंकीपॉक्स या आजारानं बाधित ४९ नव्या रुग्णांची नोंद झाली असून त्यामुळे या संसर्गानं बाधित रुग्णांची एकूण संख्या आता १४५ वर पोहोचली असल्याचं, युगांडाच्या आरोग्य मंत्रालयानं सांगितलं आहे. राजधानी कंपाला मध्ये  सर्वाधिक अर्थात २७ रुग्ण असून आत्तापर्यंत या आजारानं एकाही मृत्यूची  नोंद झाली नसल्याचं आरोग्य अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. युगांडातल्या १९ जिल्ह्यांमध्ये या आजाराचा सर्वाधिक प्रभाव असून गेल्या आठवड्यात यात मोठी वाढ झाल्याचं आढळलं आहे.  युगांडा मध्ये मंकीपॉक्स आजाराचा संसर्ग रोखण्यासाठी तसंच त्यावर नियंत्रण आणण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना सर्वतोपरी सहकार्य करत असल्याचं वृत्त आहे.