निरस्तिकरण आणि दुरुस्ती विधेयक राज्यसभेत मंजूर

निरस्तिकरण आणि दुरुस्ती विधेयक २०२५ आज राज्यसभेत चर्चेनंतर मंजूर झालं. लोकसभेनं हे विधेयक कालच मंजूर केलं होतं. एकंदर ७१ कायदे रद्द करण्याची आणि ४ कायद्यांमध्ये सुधारणा करायची तरतूद या विधेयकात आहे. 

राज्यसभेत सध्या सबका वीमा सबकी रक्षा या विधेयकावर चर्चा सुरू आहे. 

आर्थिक सायबर घोटाळे अहवाल आणि व्यवस्थापन प्रणाली सुरू केल्यापासून आलेल्या २३ लाख तक्रारीची दखल घेऊन ७ हजार कोटी रुपये इतकी रक्कम वाचवल्याची माहिती गृह राज्यमंत्री बंडी संजय कुमार यांनी राज्यसभेत दिली.

प्रधानमंत्री कौशल विकास योजनेतून गेल्या पाच वर्षांमध्ये ५३ लाखांहून अधिक उमेदवारांना प्रशिक्षण दिल्याचं केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री जयंत चौधरी यांनी आज राज्यसभेत सांगितलं.