डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

राज्यभरात, उमेदवारी अर्ज भरलेल्या रिपाई कार्यकर्त्यांनी अर्ज मागं घेऊन महायुतीचा प्रचार करण्याचं रिपब्लिकन पक्षाचं आवाहन

राज्यभरात, रिपब्लिकन पक्षाच्या ज्या कार्यकर्त्यांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत; त्यांनी आपले अर्ज मागं घ्यावेत, असं आवाहन रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे यांनी केलं आहे. जागावाटपात रिपब्लिकन पक्षावर अन्याय झाला असून त्यामुळे नाराजी पसरली आहे हे खरं असलं तरी महायुतीचं सरकार आल्यानंतर रिपब्लिकन पक्षाला राज्यात सत्तेत सहभाग देण्याचं ठोस आश्वासन भाजपा नेतृत्वानं दिलं आहे. त्यामुळे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार, रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी नाराजी बाजूला ठेवून महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करावा, आणि महायुतीला विजयी करण्यासाठी प्रयत्न करावेत, असं त्यांनी आज प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.